Tuesday, September 8, 2009

छत्रपती शिवाजी महाराज १

प्रेम असावे असे

प्रेम असावे असे
एक होतं छोटंसं तलाव पाण्याने समृद्ध भरलेलं चोहिकडे हिरवळ असलेलंत्याचं पाणि इतकं गोड़ होतं की लोकं त्याने आपली तहान भागवायचेपण कोणालाही त्या तलावाशी आपुलकी वाटायची नाहीमग एके दिवशी ते तलाव सुकलेजे लोक त्याच्या पाण्याने तहान भागवायचे, तेच आता त्याला कुरूप आणि कचरा टाकायचे ठिकाणम्हणु लागलेत्या तलावाला आत फक्त आस होती पावसाचीमग शेवटी पावसाळा आलात्याला आशा होती की एक तरी ढग त्याच्यावर कोसळणारपण त्याची ही आशा खोटी ठरली आणि सारे ढग हळुहळु वाहून गेलेतलाव पुन्हा निराश झाले

मग एक शेवटचे ढग तिथून पसार झाले। त्याला त्या सुकलेल्या तलावाला पाहण्याची इच्छा झाली। ते ढग क्षणभर तिथेच थांबुन तलावाला बघत राहिले। बघता-बघता त्याचा तलावाशी जीव जुळला आणि ते ढग त्या तलावावर आपले सर्वस्व लुटवुन वर्षु लागले। त्या ढगाने असा वर्षाव केला की ते तलाव भरून वाहू लागले आणि त्याला आपले हरवलेले सौंदर्य परत मिळाले व ते ढग पूर्णपणे रिकामे झाले।
शेवटी तलावाने त्या ढगाला विचारले "त्यागुनी सर्वस्व आपुले, रूप तू माझे का सावारलेस। " तलावाच्या प्रश्नाचे ढगाने हसत उत्तर दिले, "तुझे सौन्दर्य तुला परत मिळाले, याचे मला आहे अभिमान खुपआणि त्यात मी काही थोर कार्य केले नाही, कारण जे तुला पुन्हा मिळाले तुझे रूप, जरा नीट बघ, त्यात आहे माझेच स्वरुपम्हणुन उपकार मानून माझ्या प्रेमाचं अपमान करू नकोस।" आणि ते ढग पूर्णपणे कोसळुन त्या तलावाच्या अंतरात विलीन झाले आणि तलावाने पण त्याला आपल्यात सामावून घेतले
यालाच म्हणतात निरपेक्ष, निस्वार्थ आणि पवित्र प्रेम, जे आपण प्रकृतिकडून शिकायला हवे।

___ देव

Monday, September 7, 2009

किसीने समझा ही नहीं

मैं कहना चाहता हूँ क्या,
ये किसीने समझा ही नहीं
इस दिवाने दिल का अरमान हैं क्या ,
ये किसीने समझा ही नहीं
मेरी हँसी के साथ-साथ,
वो भी हँस दिए ज़ोर से
किन हालातों में हँसता हूँ मैं,
ये किसीने समझा ही नहीं
____ देव

इम्तिहान

क्या हुआ अगर आनेवाले इम्तिहान और भी हैं,
क्या हुआ अगर सामने तूफ़ान और भी हैं
अभी तो आसमान के आगे आसमान और भी हैं,
तारों से आगे जीतने के लिए एक जहाँ और भी है
तू फ़िक्र ना कर ग़मों की दोस्त,
अभी राहों में आनेवाले खुशियों के मकाम और भी हैं
___देव

Monday, October 6, 2008

मी उष्ण उन्हाळा


मी उष्ण उन्हाळा

मी आहे उष्ण उन्हाळा,
ह्याची गरमी तुला सोसेल का।
माझ्या वाटेत गालिचा कंटकांचा,
सोबत माझ्या चालु शकशील का।

जगासाठी मी आहे एक काटा,
गुलाबावाने माझ्यासंगे राहू शकशील का।
दुःखाने भरलेल्या जीवनात माझ्या,
सुखाच्या सुगंधासार्खी तू दर्वळशील का।

मी आहे सैरभैर उन,
तू सावली होउन येशील का।
तू आहेस खुप शहाणी आणि भोळी,
मज वेड्या बरोबर जगु शकशील का।

मी आहे समुद्र खारट,
तू गोड नदी माझ्यात मिसळशील का।
मी आहे दु:खांचा बेताज बादशाह,
माझ्याबरोबर खुश राहू शकशील का,
माझ्याबरोबर खुश राहू शकशील का।


_____ देव


काय सांगू सखे तुला........

काय सांगू सखे तूला
काय सांगू सखे तूला ,
तुजविण संसार कसा वाटतो
जसा क्षणात तुटून पडणारा पाउस,
कुठेतरी वर्षांनोवर्ष थांबतो

तू सोबत नसल्यावर माझ्या,
तुझ्या आठवणी येतात सतत मला
आठ्वणिंच्या जागी तूच का येत नाही,
असा प्रश्न नेहमी मनात येतो
तूच, तूच आहेस ती स्वप्नपरी माझी,
ज्याची गाणी मी गात असतो
तुझाच एकमात्र चेहरा आहे,
जो मी सर्वत्र शोधत असतो
काय सांगू सखे तुला.............

प्रथम तू दिसल्यास,
प्रभाती किरणे ही रागावतात
कधी येशील तू भेटायला,
हे वाहणारा वारासुद्धा विचारतो
किती गं आवरू मी भावनांना,
उरी भावनांचा समुद्र उफाण मारतो
जायायचे असले जरी दुस्र्या ठिकाणी,
तरी तुझ्याच दिशेला मी पाउले पाडतो
काय सांगू सखे तुला.............


तुझा विरह सहन होत नाही मला,
मी आपल्या मिलनाची वाट बघतो
किती गं मी थांबू आता,
अंगी माझ्या वणवा पेटतो
घरातल्या भींति, छत, अंगण,
सगळेच झालेत अगदी आतुर
कधी ओलांडतेस तू उंबरठा,
तो उंबरठाही तुझी वाट बघतो
काय सांगू सखे तुला.............

नाही रहावत मला आता,
लवकर मला मिठीत घे गं.
आयुष्यभर त्या मिठीत राहू शकेन ,
अश्या त्या दिवसाची मी वाट पाहतो
काय सांगू सखे तूला ,
तुजविण संसार कसा वाटतो
भरल्या मैफिलीत कोणी एकटा असेल,
संसार माझा मला असा वाटतो।

काय सांगू सखे तुला.............



____ देव








तू यायच्या आधी


प्रिये,
खुप एकटा होतो मी तू यायच्या आधी,
नुसता भटकत होतो मी तू यायच्या आधी
जीवनाचा अर्थ काय असतो,
तुला भेटून कळले मजला
जीवन वाया जात होते माझे,
तू यायच्या आधी
____ देव