Monday, October 6, 2008

काय सांगू सखे तुला........

काय सांगू सखे तूला
काय सांगू सखे तूला ,
तुजविण संसार कसा वाटतो
जसा क्षणात तुटून पडणारा पाउस,
कुठेतरी वर्षांनोवर्ष थांबतो

तू सोबत नसल्यावर माझ्या,
तुझ्या आठवणी येतात सतत मला
आठ्वणिंच्या जागी तूच का येत नाही,
असा प्रश्न नेहमी मनात येतो
तूच, तूच आहेस ती स्वप्नपरी माझी,
ज्याची गाणी मी गात असतो
तुझाच एकमात्र चेहरा आहे,
जो मी सर्वत्र शोधत असतो
काय सांगू सखे तुला.............

प्रथम तू दिसल्यास,
प्रभाती किरणे ही रागावतात
कधी येशील तू भेटायला,
हे वाहणारा वारासुद्धा विचारतो
किती गं आवरू मी भावनांना,
उरी भावनांचा समुद्र उफाण मारतो
जायायचे असले जरी दुस्र्या ठिकाणी,
तरी तुझ्याच दिशेला मी पाउले पाडतो
काय सांगू सखे तुला.............


तुझा विरह सहन होत नाही मला,
मी आपल्या मिलनाची वाट बघतो
किती गं मी थांबू आता,
अंगी माझ्या वणवा पेटतो
घरातल्या भींति, छत, अंगण,
सगळेच झालेत अगदी आतुर
कधी ओलांडतेस तू उंबरठा,
तो उंबरठाही तुझी वाट बघतो
काय सांगू सखे तुला.............

नाही रहावत मला आता,
लवकर मला मिठीत घे गं.
आयुष्यभर त्या मिठीत राहू शकेन ,
अश्या त्या दिवसाची मी वाट पाहतो
काय सांगू सखे तूला ,
तुजविण संसार कसा वाटतो
भरल्या मैफिलीत कोणी एकटा असेल,
संसार माझा मला असा वाटतो।

काय सांगू सखे तुला.............



____ देव








No comments: