Showing posts with label PREMKAAVYA. Show all posts
Showing posts with label PREMKAAVYA. Show all posts

Tuesday, November 3, 2009

खुप दिवस झाले.........


खुप दिवस झाले

खुप दिवस झाले,
तुला घट्ट मिठीत घेतले नाही।
तुझ्या
श्वासांशी माझा श्वास जुळला नाही,

तुझ्या
केसात एखादा गजरा माळला नाही।


खुप दिवस झाले,

तू
माझ्या जवळ बसली नाही।

घेउनी
तुझ्या हातात हात माझा,

तुझ्या
मनातली बात तू मांडली नाही।


खुप
दिवस झाले,

तुझा
चेहरा निरखून पाहिला नाही।

तुझ्या
डोळ्यात नेहमी असणारा चेहरा माझा,

मी निवांतपणे पाहिलाच नाही।


खुप
दिवस झाले,

तू
माझ्या खांद्यावर डोकं ठेउन झोपली नाही।

तुला
गाढ़ झोपेत असताना,

अधीर मनाने मी पाहिले नाही।


खुप
दिवस झाले,

आपण
समुद्राच्या काठी गेलो नाही।

एकमेकाचा
हात घट्ट धरुनी,

आपण
दूर- दूर पर्यंत चाललो नाही।


खुप
दिवस झाले,

तुझ्या
ओठातले मधु प्यायलो नाही।

अनमोल
त्या गुलाबी पाक्ळयांचा,

नाजुक
तो स्पर्श अनुभवला नाही।


खुप
दिवस झाले,

तुला
खळखळुन हसवले नाही।

उदासीन
तुझ्या त्या ओठांवर,

माझ्यामुळे
स्मित फिरकले नाही।


खुप
दिवस झाले,

आपण
मनसोक्त प्रेम केलेच नाही।

अख्या
दुनियेचा विचार करता - करता,

आपण
आपलाच विचार केला नाही।


खुप
दिवस झाले,

तुझ्या
डोळ्यातले अश्रु पुसले नाही।

सतत
दुःखामुळे वाहणार्या त्या झर्याला,

तुझ्या
जवळ येउन मी थांबवले नाही।


खुप
दिवस झाले,

खुप
आवडतेस तू मला हे सांगितले नाही।

तुझ्याशिवाय
जगणे कठिण नव्हे अशक्य आहे,

हे
तुझ्या कानात परत एकदा सांगितले नाही।


खुप
दिवस झाले,

मोकळ्या
मनाने तुझ्यापुढे रडलो नाही।

भरपूर
वेदना आहेत जीवनात माझ्या,

हे
तुला सांगू शकलो नाही।


खुप
दिवस झाले,

आपण
पहिल्यासरखे जगलोच नाही।

तू
माझीच आणि मी फक्त तुझाच आहे,

अशारित्या
आपण वाग्लोच नाही।


चल
ना सये सारे विसरुया,

एकमेकात
अशे गुंतुया।

पुन्हा
अशे भेटूया,

जसे
आपण कधी भेटलोच नाही।


कारण
खुप दिवस झाले .......................



______देव





Friday, January 25, 2008