Showing posts with label MARATHI KAVITA. Show all posts
Showing posts with label MARATHI KAVITA. Show all posts

Tuesday, May 31, 2011

स्मरशील तू .....

आयुष्याच्या या वळणावर
कधीतरी भेटशील तू .
मौन धारण केलेस जरी तू तेव्हा,
कित्येक गोष्टी नजरेने सांगशील तू.

तुला दिलेले वचन मी,
अजूनही पाळतो आहे,
एकांत या ह्रुदयात माझ्या,
नेहमी प्रिये राहशील तू.

एवढे वचन दे आज साजणे,
स्मृतित तुझ्या मला ठेवशील तू.
नसेन मी या जगात जेव्हा,
कधीतरी मला स्मरशील तू.....
___________देव

Tuesday, December 15, 2009

सुखामागे धावता धावता .......



सुखामागे धावता धावता. . . . .



सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण,
पाण्यात राहूनही मग माशाची भागत नाही तहान.
स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खुप,
वाटी-वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तुप.


बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ,
पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागु नका वेळ.
करियर होतं जीवन मात्र जगायचं जमेना तंत्र,
बापाची ओळख मुलं सांगती पैसा छापायचं यन्त्र.


चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वत:च पाहुणा स्वत:च्या घरी,
दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी.
मुलंच मग विचारू लागतात बाबा अजुन का हो घरी?
त्यांचा ही दोष नसतो त्यांना सवयच नसते मुळी.


क्षणिक औदासिन्य येतं मात्र पुन्हा सुरु होतं चक्र,
करियर करियर दळन दळता स्वास्थय होतं वक्र.
सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती वाढलेल्या,
आतून मात्र मातीच्या भिंती कधी न सारवलेल्या.


आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही.
सर्व काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं,
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं.

______ (अज्ञात कवी)

Saturday, November 14, 2009

एक प्रश्न देवाला .....


एक प्रश्न विचारू देवा तुला,
का आणलेस या जगात मला।
इथे नाही मिळत सुख किंवा शांति,
सतत वेदना सतवतात मला।

सुर्याच्या फक्त एका किरणेसाठी,
आयुष्यभर मी तेवत राहिलो।
पण हाय रे दैवत माझे,
अंधकारच सापडले क्षणा-क्षणाला।

वाटत होते मनाला माझ्या,
जीवनात सुरेल संगीत रेलावे
पण मनातल्या आक्रंदाची कर्कशता,
नेहमी ऐकू येत असते मला।

ना साथी, ना सवंगडी, ना यार,
जीवनात माझ्या आहे एकान्ततेचं साम्राज्य।
कोणी नाही इथे माझं म्हणायला,
सगळेच परके वाटतात मला।

कर्तव्याला कधी चुकलो नाही,
जवाबदार्यांना कधी भुललो नाही।
तरी ही का मज कळेना,
अपयशाचा बादशाह म्हणतात मला।

लोकांना भीती वाटते ठिणग्यांची,
माझ्यात ज्वालामुखी जपलेय मी।
क्षण-प्रतिक्षण प्रत्येक स्वप्नांचे,
शव पेटताना दिसतात मला।

नाही कुठे विसावा, निवांत, व समाधान,
फक्त दुःख, वेदना,यातना दिलेस तू मला।
वेळ मिळाल्यास कधी माझ्याकडे बघून घे,
आणि मग तू सांग मला,

खरंच का आयुष्य म्हणतात ह्याला,
खरंच का आयुष्य म्हणतात ह्याला ...............



_______ देव

Monday, October 6, 2008

मी उष्ण उन्हाळा


मी उष्ण उन्हाळा

मी आहे उष्ण उन्हाळा,
ह्याची गरमी तुला सोसेल का।
माझ्या वाटेत गालिचा कंटकांचा,
सोबत माझ्या चालु शकशील का।

जगासाठी मी आहे एक काटा,
गुलाबावाने माझ्यासंगे राहू शकशील का।
दुःखाने भरलेल्या जीवनात माझ्या,
सुखाच्या सुगंधासार्खी तू दर्वळशील का।

मी आहे सैरभैर उन,
तू सावली होउन येशील का।
तू आहेस खुप शहाणी आणि भोळी,
मज वेड्या बरोबर जगु शकशील का।

मी आहे समुद्र खारट,
तू गोड नदी माझ्यात मिसळशील का।
मी आहे दु:खांचा बेताज बादशाह,
माझ्याबरोबर खुश राहू शकशील का,
माझ्याबरोबर खुश राहू शकशील का।


_____ देव


काय सांगू सखे तुला........

काय सांगू सखे तूला
काय सांगू सखे तूला ,
तुजविण संसार कसा वाटतो
जसा क्षणात तुटून पडणारा पाउस,
कुठेतरी वर्षांनोवर्ष थांबतो

तू सोबत नसल्यावर माझ्या,
तुझ्या आठवणी येतात सतत मला
आठ्वणिंच्या जागी तूच का येत नाही,
असा प्रश्न नेहमी मनात येतो
तूच, तूच आहेस ती स्वप्नपरी माझी,
ज्याची गाणी मी गात असतो
तुझाच एकमात्र चेहरा आहे,
जो मी सर्वत्र शोधत असतो
काय सांगू सखे तुला.............

प्रथम तू दिसल्यास,
प्रभाती किरणे ही रागावतात
कधी येशील तू भेटायला,
हे वाहणारा वारासुद्धा विचारतो
किती गं आवरू मी भावनांना,
उरी भावनांचा समुद्र उफाण मारतो
जायायचे असले जरी दुस्र्या ठिकाणी,
तरी तुझ्याच दिशेला मी पाउले पाडतो
काय सांगू सखे तुला.............


तुझा विरह सहन होत नाही मला,
मी आपल्या मिलनाची वाट बघतो
किती गं मी थांबू आता,
अंगी माझ्या वणवा पेटतो
घरातल्या भींति, छत, अंगण,
सगळेच झालेत अगदी आतुर
कधी ओलांडतेस तू उंबरठा,
तो उंबरठाही तुझी वाट बघतो
काय सांगू सखे तुला.............

नाही रहावत मला आता,
लवकर मला मिठीत घे गं.
आयुष्यभर त्या मिठीत राहू शकेन ,
अश्या त्या दिवसाची मी वाट पाहतो
काय सांगू सखे तूला ,
तुजविण संसार कसा वाटतो
भरल्या मैफिलीत कोणी एकटा असेल,
संसार माझा मला असा वाटतो।

काय सांगू सखे तुला.............



____ देव








तू यायच्या आधी


प्रिये,
खुप एकटा होतो मी तू यायच्या आधी,
नुसता भटकत होतो मी तू यायच्या आधी
जीवनाचा अर्थ काय असतो,
तुला भेटून कळले मजला
जीवन वाया जात होते माझे,
तू यायच्या आधी
____ देव

Wednesday, February 6, 2008