Saturday, November 14, 2009

एक प्रश्न देवाला .....


एक प्रश्न विचारू देवा तुला,
का आणलेस या जगात मला।
इथे नाही मिळत सुख किंवा शांति,
सतत वेदना सतवतात मला।

सुर्याच्या फक्त एका किरणेसाठी,
आयुष्यभर मी तेवत राहिलो।
पण हाय रे दैवत माझे,
अंधकारच सापडले क्षणा-क्षणाला।

वाटत होते मनाला माझ्या,
जीवनात सुरेल संगीत रेलावे
पण मनातल्या आक्रंदाची कर्कशता,
नेहमी ऐकू येत असते मला।

ना साथी, ना सवंगडी, ना यार,
जीवनात माझ्या आहे एकान्ततेचं साम्राज्य।
कोणी नाही इथे माझं म्हणायला,
सगळेच परके वाटतात मला।

कर्तव्याला कधी चुकलो नाही,
जवाबदार्यांना कधी भुललो नाही।
तरी ही का मज कळेना,
अपयशाचा बादशाह म्हणतात मला।

लोकांना भीती वाटते ठिणग्यांची,
माझ्यात ज्वालामुखी जपलेय मी।
क्षण-प्रतिक्षण प्रत्येक स्वप्नांचे,
शव पेटताना दिसतात मला।

नाही कुठे विसावा, निवांत, व समाधान,
फक्त दुःख, वेदना,यातना दिलेस तू मला।
वेळ मिळाल्यास कधी माझ्याकडे बघून घे,
आणि मग तू सांग मला,

खरंच का आयुष्य म्हणतात ह्याला,
खरंच का आयुष्य म्हणतात ह्याला ...............



_______ देव

No comments: